• Home
  • Category: रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार!

कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस १५पासून विस्टा डोम कोचसह धावणार! रत्नागिरी ,(सुनील धावडे): मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यापर्यंत धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला दिनांक 15 सप्टेंबरपासून विस्टा डोम कोच जोडण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील सीएसएमटी ते गोव्यातील करमाळी दरम्यान धावणारी (22119/22120) तेजस एक्सप्रेस दिनांक १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत धावणार आहे. त्याआधी…

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जीजीपीएसला देणगी रत्नागिरी,(सुनील धावडे) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्यासह अविनाश काळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे…

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचा- अॅड. दीपक पटवर्धन

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचा- अॅड. दीपक पटवर्धन रत्नागिरी,(सुनील धावडे) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्याबाबत प्रदेश भाजपाकडून कोणतेही आदेश आलेले नाही. निवडणुका लढवण्याबाबतच्या सूचना काही दिवसांनी येतील. परंतु तोपर्यंत कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती आपापल्या वाडी, गाव जि. प. गटात…

संरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत

संरक्षण भिंत कोसळली, गणपती मंदिरावर झाड पडले , पावसामुळे जनजीवन विस्कळीत राजापूर/रत्नागिरी,(सुनील धावडे) : शनिवारी दिवसभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने रविवारी मध्यरात्री जवाहर चौकापर्यंत धडक दिली होती. मात्र रविवारी सकाळी पाऊस काहीसा कमी झाल्याने पाण्याची पातळी ओसरली. मात्र तरीही संततधार पडणाऱ्या…

ओबीसींचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत; ओबीसी जनमोर्चाची मागणीं, पटोले यांना दिले निवेदन

ओबीसींचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत; ओबीसी जनमोर्चाची मागणीं, पटोले यांना दिले निवेदन राजापूर/रत्नागिरी,(सुनील धावडे) : ओबीसींचे राजकीय आरक्षण पूनर्स्थापित करण्यासाठी जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समर्पित आयोगाच्या अहवालासंबंधी व त्यांनी केलेल्या शिफारशींसंबंधी आमचे आक्षेप नोंदवा, दशवार्षिक जनगणना करण्यात यावी तसेच या जनगणनेच्या धर्तीवर सखोल सर्वेक्षण करण्यात यावे, ओबीसींचे राजकीय…