विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी= किरण अहिरराव
मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसापासून महाआघाडी मध्ये निवडणुकांवरून एकमत होत नव्हतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. त्या बैठकीत राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत कांग्रेसला 2 उमेदवाराची जागा दिल्याने महाविकास आघाडी मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यातूनच या कोरोनाच्या संकटात ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी केली.
सर्व बाबीचा विचार करून 5 जागांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
कोरोनाचे संकट नसते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार नसते तर कदाचित ही निवडणूक झाली असती. मुख्यमंत्री स्वतः कोरोनाच्या संकटात काम करत आहेत.त्यामुळे या काळात निवडणुका होऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही सर्वांनी बिनविरोध निवडणूक घेण्याच निर्णय घेतला आहे. आणि मुख्यमंत्री
यांनी यांनी कोणताही गोधळ वाढू नये म्हणून अशी विनंती केली ‘असे थोरात म्हणाले.