**आज ४ वा. मोदीजी देशाला संबोधीत करणार**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. दुपारी 4 वाजता ते देशवासियांशी संवाद साधतील. देशात Unlock 2ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर चीन सोबतचा सीमा वादही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. रविवारी झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी नाव न घेता चीनला इशारा दिला होता. तर सोमवारीच सरकारने मोठा निर्णय घेत तब्बल 59 चिनी Appsवर बंदी घातली होती.
कोरोना आणि नंतरचं लॉकडाउन या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशवासियांशी संवाद साधत असून त्यांनी याच माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.1जुलै ते 31 जुलै या काळात नाईट कर्फ्यू असेल. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत संचाबंदी असेल. पण म्हणजे नेमके कुठले व्यवहार खुले होणार आणि कुठले निर्बंध कायम राहणार याविषयी स्पष्टता आणणारा केंद्राचा आदेशही आता निघाला आहे. Misshion Begin again ही योजना सुरू असली, तरी Coronavirus चा वाढता धोका लक्षात घेऊन प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. 31 जुलैपर्यंत हे निर्बंध कायम असतील, दरम्यान, Coronavirus वर नियंत्रण अजूनही मिळालेलं नसल्यामुळे अजूनही सार्वजनिक जीवनावर निर्बंध कायम असतील, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.
Home Breaking News **आज ४ वा. मोदीजी देशाला संबोधीत करणार**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा...