Home Breaking News पालघर,वसई-विरार मधे बाधीतांची संख्या ४२४५ ! ग्रामीण भागात चिंता.. ✍️ पालघर...

पालघर,वसई-विरार मधे बाधीतांची संख्या ४२४५ ! ग्रामीण भागात चिंता.. ✍️ पालघर ( अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

485
0

🛑 पालघर,वसई-विरार मधे बाधीतांची संख्या ४२४५ ! ग्रामीण भागात चिंता.. 🛑
✍️ पालघर ( अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पालघर/विरार :⭕पालघर जिल्ह्यात ४ हजार २४५ कोरोनाबाधित तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला असून ही साखळी वाढतच चालली आहे. त्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये रविवार-पर्यंतच्या आकडेवारीनुसार पालघर तालुक्यामध्ये २९०, डहाणू ९३, तलासरी १३, जव्हार १०१, मोखाडा २२, वसई ग्रामीण १६५, विक्रमगड ९९, वाडा २१५, तर वसई-विरारमध्ये सर्वाधिक ३५५० एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढत असलेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने तर नागरिकांच्या मनात भीतीची दाट छाया पसरलेली आहे. तीन हजारचा टप्पा पार करून आता वेगाने येथे बाधितांची संख्या वाढत आहे.
गेल्या दोन दिवसांत साडेतीनशे, अडीचशेच्या संख्येने येथे रुग्ण बाधित आढळून येत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात या जीवघेण्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरपेक्षा जास्त झालेली आहे, मात्र त्याच वेळी आनंदाची बाब म्हणजे ५० टक्केपेक्षा जास्त रुग्णांनी या जीवघेण्या आजावर मातही केलेली आहे.

याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एकट्या पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी अडीचशेचा टप्पा पार केला आहे. वाडासारख्या भागातीलही दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच वेळी वसई ग्रामीण भागामध्ये जवळपास दीडशे कोरोनाधित आढळून आले आहेत. विक्रमगडसारख्या भागातही बाधितांचा आकडा शतकानजीक पोहोचला आहे⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here