सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना १२ महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित द्या ; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
➖➖➖➖➖➖➖➖
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
➖➖➖➖➖➖➖➖
मुंबई दि. १७ – सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना १२ महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित देण्यात यावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही वेतन वा मानधनात कपात करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे या प्रशिक्षकांना त्यांच्या अनुभवाचा विचार करता सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
यासंबंधीची बैठक विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, शिक्षण विभागाचे उप सचिव राजेंद्र पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. पटोले म्हणाले, या प्रशिक्षकांना मागील ५ वर्षांपासून मानधन वाढ मिळालेली नाही. इतर राज्यांमध्ये वेतनामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांनादेखील वेतनवाढ देण्यात यावी. व्यवसाय प्रशिक्षण अंतर्गत राज्यामध्ये ११०० प्रशिक्षक कार्यरत आहेत. या प्रशिक्षकांना चांगला अनुभव असून त्यांना शासनाच्या सेवेत नियमित करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.