आशाताई बच्छाव
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार..
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राळ गावातील रहिवासी सुनिल साहेबराव बेहेरे(विरदेलकर)(३५) व त्यांचा भाचा चेतन पंकज देसले (२१) रा. भडणे हे आज याच्यासोबत दुचाकी (एमएच १८/ बीडब्ल्यु २४२०) ने एमआयडीसीत नेहमीप्रमाणे कामाला जात होते. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बाभळे फाट्याजवळ मागाहून येणाऱ्या भरधाव कंटेनर (डिएन ०९/आर ९८६७) ने त्यांच्या दुचाकीला जोदार धडक दिली. या भीषण अपघातात मामा-भाचे जागीच ठार झाले. यावेळी रस्त्यावरील प्रवाशांनी तात्काळ पोलीस मदत केंद्रावर माहिती कळविली. त्यानंतर शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोघांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्राणज्योत मालवली होती.
दरम्यान, या अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रभान सीतलाप्रसाद प्रजापती (३२) रा. उत्तरप्रदेश ह.मु. रा. चेंबुर, मुंबई हा स्वतः हून शिंदखेडा पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी पंकज जगन्नाथ देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






