आशाताई बच्छाव
युवा मराठा महासंघाच्या आंदोलन इशा-यानंतर घरकुल घोटाळ्याची चौकशी साठी समिती स्थापन. साक्री, संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ धुळे नंदुरबार- साक्री तालुक्यातील टिटाणे गावात सुरू असलेल्या प्रधानमंत्री घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केल्याने व या भ्रष्टाचार प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी न झाल्यास साक्री पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा देताच, साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे यांनी तात्काळ या घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहिती महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.दरम्यान वेळेनुसार घरकुल घोटाळा भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई न झाल्यास नाशिक येथे विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचा इशारा राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.






