आशाताई बच्छाव
भास्कर आबा मांजरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल साई धनवर्षा फाउंडेशनने घेतली दखल
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे
सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रस्थानी असलेले धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील भुमी पुत्र तसेच महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक भास्कर आबा मांजरे यांच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अभिनव कार्याची दखल घेत साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने त्यांना मानाचा व सन्मानाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय विजय देशमुख यांनी दिली आहे.
साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील असंख्य हिरकणींना तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांना साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह ,शाल ,पुष्पगुच्छ व फेटा बांधून यथोचित सन्मान केला जातो. याही वर्षी या सोहळ्यासाठी धामोरी येथील भास्कर आबा मांजरे यांना या सोहळ्यामध्ये सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल शैक्षणिक, सामाजिक ,अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातून मान्यवर तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट सगेसोयरे, नातेवाईक व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहे.






