Home उतर महाराष्ट्र जामखेड येथे वाळु माफियाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 02 आरोपींकडुन 5,30,000/- रुपये...

जामखेड येथे वाळु माफियाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 02 आरोपींकडुन 5,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

233

आशाताई बच्छाव

1002169921.jpg

जामखेड येथे वाळु माफियाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 02 आरोपींकडुन 5,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
—————————————————————————————————————-अहिल्यानगर प्रतिनिधी दिपक कदम 
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार ऱ्हदन घोडके, लक्ष्मण खोकले, शामसुंदर जाधव यांचे पथक तयार करुन सदर पथकास अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन कारवाईकरणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
वरील पथक दिनांक 04/11/2025 रोजी जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास आरणगांव ते हाळगांव रोडने ट्रक क्रमांक एम.एच. 12 एफ.सी. 8769 ही मध्ये गौणखनिज वाळु भरुन फक्राबाद मार्गे हाळगांवकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ फक्राबाद गांवचे शिवारामध्ये जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील वाहन येतांना दिसले. त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने पथकाने नमुद ट्रक थांबवुन खात्री केली असता ट्रकचे पाठीमागील हौदामध्ये वाळु भरलेली असल्याचे दिसुन आले. पथकाने ट्रक चालकास त्याचे नांव गांव विचारता ट्रक चालकाने त्याचे नांव 1) रविंद्र बाळासाहेब पवार वय 32 वर्षे, रा. आरणगांव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर चालकास वाळु बाबत अधिक विचारपुस करता त्याने सदरची वाळु ही ट्रक मालक 2) शहाजी अशोक जेवे रा. खडकत ता. आष्टी, जि. बीड याचे सांगणेवरुन वाहतुक करत असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील इसमाचे कब्जातुन 30,000/- रुपये किमतीची 03 ब्रास वाळु व 5,00,000/- रुपये किमतीची ट्रक असा एकुण 5,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोना/1566 शामसुंदर अंकुश जाधव नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 599/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Previous articleसामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी  देऊ-अरविंद चव्हाण  
Next articleYuva-Maratha-09-to-15-Nov-2025
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.