Home जळगाव पाचोर्‍याचे सु.ना. पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

पाचोर्‍याचे सु.ना. पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

108

आशाताई बच्छाव

1002131791.jpg

पाचोर्‍याचे सु.ना. पाटील
यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

पाचोरा/जळगाव नरेंद्र पाटील ब्युरो चीफ 
येथील गिरणाई शिक्षण संस्था संचालित सौ. सावित्रीबाई परशराम शिंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील नारायण पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय 15 व्या शिक्षण परिषदेत राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 15 वी शिक्षण परिषद दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते सु.ना. पाटील सर यांना सपत्नीक सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याला कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव, महात्मा फुले शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री.व्यंकटराव जाधव, परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, खाजगी प्राथ. शाळा पिंपळगाव ( हरे.) चे मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे, सौ. ज्योती महालपुरे,माधव भुजाडे,अभय नंदन, सौ. रंजना पाटील उपस्थित होते.

सु.ना. पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक तथा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गिरणाई शिक्षण संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे.डी. काटकर, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, उपाध्यक्ष निरज मुणोत, संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.