Home मराठवाडा अतनूर परिसराला रात्रभर पावसाने झोडपले ! अतनुरला पाण्याचा वेढा ; तेरुनदी-नाल्यांना पूर;...

अतनूर परिसराला रात्रभर पावसाने झोडपले ! अतनुरला पाण्याचा वेढा ; तेरुनदी-नाल्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला !

105

आशाताई बच्छाव

1002002660.jpg

अतनूर परिसराला रात्रभर पावसाने झोडपले ! अतनुरला पाण्याचा वेढा ; तेरुनदी-नाल्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला !
बाळासाहेब शिंदे अतनूर प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरामध्ये दि.२६ सप्टेंबरच्या रात्री तसेच २७ सप्टेंबरच्या पहाटे मुसळधार पाऊस पडला. मंडळामध्ये तब्बल ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अतनूर परिसरातील ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जळकोट तालुक्यातील अतनूर तेरु नदी सह अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच गावाजवळून वाहणा-या तिरू नदीला तिस-यांदा महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये पुन्हा पाणी शिरले असून उरलेसुरले पीक देखील वाहून गेलेले आहे. यासोबतच तिरू नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे अतनूर ते उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्वत: तहसीलदार राजेश लांडगे तसेच पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत.
तसेच गावाला जोडणा-या दोन्ही बाजूकडील पुलावरून पाणी जात असल्यामुळे या गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे . या गावातील नागरिकांना पाच ते सहा तासांपासून गावाबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे . यासोबतच पाटोदा, रावणकोळा हळदवाढवणा ते जळकोट माळहिप्परगा या मार्गावरील वाहतूक देखील बंद झाली आहे . चिंचोली ते मेवापूर या मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी जात आहे यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. अतनूर – मेवापूर दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सहा तासांपासून या ठिकाणची देखील वाहतूक ठप्प आहे. मरसांगवी, सुल्लाळी, डोंगरगाव, तिरुका दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक देखील ठप्प झाली आहे. अतनूर या गावाला सध्या पुराने वेढा दिलेला आहे. या ठिकाणची दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली आहे. अतनूर परिसरातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिकांच्या घराकडून कमरेएवढे पाणी वाहत होते. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अतनूर तेरु नदीवरील येथील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. तिरू नदीला आलेल्या महापुरामुळे गव्हाण सह सात ही उच्च पातळी बंधारे पाण्याखाली गेले आहेत . तसेच प्रचंड पूर असल्यामुळे अतनूर जवळ तसेच गव्हाण, चिंचोली, मरसांगवी, सुल्लाळी, डोंगरगाव गावाजवळ शेतामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यासोबतच अतनूर येथे देखील महापूर आलेला आहे. अतनूरच्या बसस्थानकाजवळ सह येथील रहिवासी शंकर गव्हाणे पाटील, पांडुरंग जाधव, शिवाजी पाटील, केशवराव गव्हाणे, मैफुज मनियार, शिवाजी भांगे, गोविंदराव साधूराम शिंदे, रामराव राठोड, पोलीस पाटील प्रकाश पाटील, ग्राम पंचायत कार्यालय, औदुंबर सोमुसे, दिगांबर सोमुसे, राजकुमार रत्नपारखे, अशोकराव पाटील, मधूकर पाटील, बी.जी.शिंदे, जे.जी.शिंदे, बबिता बाबर पाटील, भीमराव राठोड, मतिमंद शाळा, वसंतराव कुलकर्णी, संजय कुलकर्णी, किराणा मालाचे दुकान व कापडाचे दुकान, कृषी सेवा व महाईसेवा दुकान, गव्हाणचे मंदिरापर्यंत पाणी जाऊन पोहोचले आहे. यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या संकटांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच अतनूर तिरू नदी काठावरील गोविंदराव येवरे, सुर्यकांत येवरे, व्यंकटराव येवरे, सुधाकर येवरे, चंद्रकांत येवरे, साहेबराव येवरे, भारत येवले , वसंतराव कुलकर्णी, संजय कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, शंकर गव्हाणे, शिवाजीराव गव्हाणे, पांडुरंग गव्हाणे, प्रकाश व्यंकटराव पाटील, अशोकराव व्यंकटराव पाटील, मधूकर पाटील, सरपंच चंद्रशेखर पाटील, विश्वनाथ सासट्टे राजेम्मा विश्वनाथ सासट्टे , गोविंदराव साधुराम शिंदे, बी.जी.शिंदे, जे.जी.शिंदे, प्रकाश सोमुसे, शाम सोमुसे, प्रल्हाद सोमुसे , शिवाजी भांगे, तानाजी भांगे, अनिल पत्तेवार, व्यंकटराव पत्तेवार, साधुसावकार पत्तेवार, शरदचंद्र पाटील राजूरकर, आशिष पाटील राजूरकर, शीलाताई अजित पाटील राजूरकर, शिरीष पाटील राजूरकर, सोपान सोमुसे, अर्जुन सोमुसे, देविदास सोमुसे, धोंडीराम सोमुसे, गोविंद कोकणे, व्यंकटराव कोकणे, विजयकुमार गव्हाणे पाटील, संजय गव्हाणे पाटील, संतोष बट्टेवाड, दादाराव संग्राम बंडरे, राजेंद्र बंडरे, प्रकाश पाटील, बाबुराव सासट्टे, माधवराव सासट्टे, विलास सासट्टे, सचिन सासटे, माधवसिंह रतनसिंग चव्हाण, छगनसिंग रतनसिंग चव्हाण, मगदूम मुंजेवार, शादुल मुंजेवार या शेतकऱ्यांसह परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. तिरू मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले ! उदगीर तालुक्यातील हाळी येथे असलेल्या तिरू मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून दरवाजे उघडल्यामुळे तसेच जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला असून यामुळे महापूर आला आहे. यावर्षी अतनूर जवळील पुलावरून तिस-यांदा पाणी गेले आहे. जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे, पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शीतल मॅडम यांची देखील पूर परिस्थितीकडे लक्ष आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन देखील उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे यांनी केले आहे. ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे अशा ठिकाणी पोलिसांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Previous articleग्राम मोहगव्हाण येथे अवैध गावठी देशी दारू अड्ड्यावर अनसिंग पोलीस स्टेशनची बेधडक कारवाई…
Next articleसाक्रीचा पांझराकान साखर कारखाना सुरू होणार शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.