Home मराठवाडा हिंगोली जिल्ह्यातील वसमत उप विभागीय अधिकारी यांना सरपंच मानधन मुख्यमंत्री निधी जमा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत उप विभागीय अधिकारी यांना सरपंच मानधन मुख्यमंत्री निधी जमा

69

आशाताई बच्छाव

1001999618.jpg

हिंगोली जिल्ह्यातील वसमत उप विभागीय अधिकारी यांना सरपंच मानधन मुख्यमंत्री निधी जमा
हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील
आज वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात माझे सरपंच पदाचे मासिक मानधन ( ३७५० रु ) मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये उपविभागीय अधिकारी श्री विकास माने सर, तहसीलदार सौ.शारदा दळवी, गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल तोटेवाड सर यांच्या कडे सुपुर्द केली.
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे, अजुनही अतिवृष्टीचा प्रभाव जाणवत आहे, पण शासन कोणताही ठोस उपाय न करता तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांची बोळवन करत आहे, हि एक प्रकारची चेष्टा आहे असे मला वाटले, म्हणुन माझे प्रति महिन्याला शासन सरपंच पदाचे मासिक मानधन ३७५० रु देते त्या पेक्षा माझ्या शेतकरी बांधवांना मदत म्हणुन देणार आहे म्हणे, माननीय मुख्यमंत्री साहेब पिकाचे नुकसान तर झालेच आहे पण ज्या जमिनीवर आम्ही आमची उपजीविका भागवतो तीच कसनारी जमीनच वाहून गेली आहे, माझे आव्हान आहे राज्यातील डॉक्टर, इंजिनियर, वकिल, शिक्षक,नोकरदार,व्यावसायिक, कंत्राटदार, शेतकरी आज धायमोकळून रडतोय त्यांच्या असवाना शक्य ती फुंकर घाला.
सरकारने तत्काळ उपाय म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी व सरसकट कर्ज माफीचा निर्णय येत्या अधिवेशनात घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आहे.