आशाताई बच्छाव
सौर पंपांची तत्काळ दुरुस्ती करा; खासदार लंके यांची मागणी अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार, ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसोबतच सौर पंपांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. महाऊर्जा विभागाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या सौर पंपांची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसामुळे सौर पंपांचे मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधील सौर पंपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीच्या पाणी पुरवठ्याबाबतचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सौर पंपांचे नुकसान भरून काढण्यासाठी विम्याच्या माध्यमातून या पंपांची तत्काळ दुरूस्ती करून देणे गरजेचे असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे.