Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’

43

आशाताई बच्छाव

1001999437.jpg

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’          अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात २६ व २८ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला
अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी
धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये
नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल,बंधारे ओलांडू नये

आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी.

Previous articleमाजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपालिकेवर मोर्चा
Next articleसंभाजी गायकवाड कोतवाली पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.