आशाताई बच्छाव
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपालिकेवर मोर्चा अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
माझ्या आमदारकीच्या काळात कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर केली होती. मात्र, तरीही ही कामे सुरु झालीच नाहीत. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पालिकेचे कोणीही अधिकारी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना उपलब्ध झाले नाही. पालिकेचे जबाबदार अधिकारी मोर्चाला सामोरे गेले नाहीत. पालिकेसमोर तनपुरे यांनी राज्य सरकार, भाजप आमदार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
आज सकाळी साडेअकरा वाजता राहुरी नगरपरिषदेमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाने धडक मोर्चा काढला. नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजातील निष्क्रियता, निधी असूनही कामे न होणे या मुद्द्यांवर रोष व्यक्त करत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या कार्यशैलीवर टीका करण्यात आली.