आशाताई बच्छाव
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेची कार्यकारणी गठीत
शहर अध्यक्षपदी ॲड.विरेंद्र पाटील तर प्रसिद्धी प्रमुख पदी रुपेश पाटील भोकसखेडकर यांची निवड
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाजाची नुकतीच शहर व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली असून शहराध्यक्षपदी अँड.विरेंद्र पाटील यांची तर प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार रुपेश पाटील भोकसखेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरील बैठक मंगळवार दि. २३ रोजी येथील बंडय्या अप्पा स्वामी मठ संस्थान गांधी चौक मध्ये पार पडली.
याप्रसंगी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जयचंद ततापुरे , बोमनाळीकर, शिवराज मुगावे, गुरूराज पाटील, मदन पाटील यांची उपस्थिती होती.
शहर कार्यकारणी मंडळ पुढीलप्रमाणे शहराध्यक्षपदी अँड.विरेंद्र नागनाथराव पाटील, कार्यकारी अध्यक्ष पदी बस्वराज शंकरअप्पा द्याडे,उपाध्यक्ष पदी देविदास गुंडेराव मटके
, सुर्यकांत बंडप्पा गंदीगुडे ,मल्लिकार्जुन गंगाधर देगलूरकर तर सचिव म्हणून अशोक विठ्ठलराव धर्माजे,सहसचिव सुभाष हणमंतराव पाटील ,कोषाध्यक्ष मन्मथ मारोतराव मुंके,वधू -वर सुचक प्रमुख पदी प्रा.संजय हणमंतराव पाटील ,रवींद्र शंकर अप्पा द्याडे,संगम बापुराव बोधणे
प्रसिद्धी प्रमुख रूपेश पाटील भोकसखेडकर
मार्गदर्शक म्हणून
अशोकराव गंगाधराव साखरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.