आशाताई बच्छाव
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे -पूरपरिस्थितीत प्रशासनाकडून १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
जिल्ह्यात २२ ते २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व कर्जत या तालुक्यातील ओढे-नाले व नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३१ कुटुंबांची सुरक्षितस्थळी प्रशासनाने स्थलांतर केले आहे. प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकाने सुटका
पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या कर्जत व शेवगाव तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण, सितपूर, आखेगाव व भगूर या गावांतील १३१ कुटुंबांतील सुमारे ४६५ नागरिक, १४९ जनावरे जनावरांना गावातील शाळा व नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एनडीआरएफचे पुणे पथक कर्जत तालुक्यात तर एसडीआरएफचे धुळे पथक पाथर्डी तालुक्यात तैनात असून, जिल्हा प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे,