आशाताई बच्छाव
अपर तहसिल कार्यालयात 6 ऑक्टोबर रोजी
जप्त केलेल्या मिळकतींचा जाहीर लिलाव
मालेगाव, (आंशूराज पाटील राऊत):
मालेगाव तालुक्यातील सायने बु., येथील गट नंबर 383, 412, 414,385,413,415 व 416 या मिळकतदारांनी दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेल्या आदेशातील रक्कम शासन जमा केली नसल्याने या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मिळकतींचा जाहीर लिलाद्वारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यासाठी 6 ऑक्टोबर,2025 रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव अपर तहसिल कार्यालय येथे जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर तहसिलदार ज्योती देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
महसुल वसुली प्रलंबित असलेल्या 1) श्री. अन्सारी मोह. यासिन गुलाम मुर्तुजा रा. हाऊस नं. 1019, इस्लापुरा, ता. मालेगाव, जि. नाशिक. 2) श्री. शेख सादीक शेख हनन, रा. मोमिन नगर, लेन नं. 7. ता. मालेगाव, जि. नाशिक 3) श्री. अब्दुल हमीद अब्दुल कादिर रा. न्यू अमिनिया मजिद, आझाद नगर, रा. हाऊस नं. 455 रविवार वार्ड, न्यू प्रेस कॉलनी, ता. मालेगाव, जि. नाशिक 4) श्री. अब्दुल लतीफ मोहमद युसुफ रा हाऊस नं. 455 रविवार वार्ड, न्यू प्रेस कॉलनी, ता. मालेगाव, जि. नाशिक 5) श्री. मोहमंद यासिन अब्दुल हाय, रा. हाऊस नं. 486, लेन नं. 12 नयापुरा, ता. मालेगाव, जि. नाशिक 6) श्री. शेख कादिर शेख याकुब रा. रमजानपुरा, गट नं. 231/233, प्लॉट नं. व्यवस्थापकीय संचालक, मालेगाव को-ऑप. स्पिनिंग 47, द्याने, ता. मालेगाव, जि. नाशिक 7) श्री. मसूद अहमद मोहमंद उस्मान रा. हाऊस नं. 392, मोहमद अलि रोड, मंगळवार वार्ड, ता. मालेगाव, जि. नाशिक 8) श्री. हिरामण मोतीराम पाटील, रा. सचिन पॅलेस, न्यु सरस्वती विदयालय, सायने बुद्रुक, ता. मालेगाव 9) श्री. शेख अब्दुल जब्बार आजिमोददीन रा. नयापुरा, सुलेमानी मजिद मागे, मालेगाव, ता. मालेगाव या मिळकतदारांकडून जमीन महसुलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे. सायने बु. येथील गट क्रमांक 383– क्षेत्र 3.58, आकारणी 358.00, गट क्र.412 — क्षेत्र 3.93, आकारणी 786.00, गट क्र. 414—क्षेत्र 1.83, आकारणी- 366.00, गट क्र. 385—क्षेत्र 2.58, आकारणी- 500.00, गट क्र. 413— क्षेत्र 3.75, आकारणी- 750.00, गट क्र. 415—क्षेत्र 2.13, आकारणी- 3.12.00, गट क्र. 416—क्षेत्र 1.09, आकारणी- 218.00 याप्रमाणे तपशिल आहे, अशीही माहिती अपर तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.