Home नाशिक शंकर बाबासाहेब गुंजाळ

शंकर बाबासाहेब गुंजाळ

83

आशाताई बच्छाव

1001985448.jpg

निधन वार्ता

शंकर बाबासाहेब गुंजाळ

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

गेले दिगंबर ईश्वर विभूति
राहिल्या त्या किर्ती जगा माजी

‘ना भरोसा इस जिंदगी का’ या उक्तीप्रमाणे आमचे स्नेही सन्मित्र तसेच नातलग ,आडगाव रेपाळ तालुका येवला येथील प्रगतीशील शेतकरी, समृध्दी फिडस् पुणे संचालक मच्छिंद्र बाबासाहेब गुंजाळ यांचे मोठे बंधू व इंजिनिअर निलेश देवरे निमोण तालुका चांदवड यांचे दाजी शंकर बाबासाहेब गुंजाळ वय: ४२ वर्षे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
अतिशय नम्र, प्रेमळ व परिवाराला प्रगतीपथावर घेऊन जाणारे शंकर गुंजाळ यांचे निधनाचे वृत्त कळताच आडगाव रेपाळ परिसरातील आप्तेष्ट, सगेसोयरे, नातेवाईक व मित्र परिवाराने शोक व्यक्त केला.नात्यातील प्रत्येकाच्या सुख- दुःखात सहभागी होणारे, मनमोकळ्या स्वभावाचे, शंकरराव गुंजाळ यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, येवला तालुक्यातील, परिसरातील व आडगाव रेपाळ येथील सर्व ग्रामस्थ हितचिंतक, मित्र परिवार, आप्तेष्ट, सगेसोयरे, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते‌. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला असून गुंजाळ परिवाराला झालेल्या दुःखातून परमेश्वर सावरण्याची शक्ती देवो हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन चुलते, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी
दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुवार रोजी महादेव मंदिर, आडगाव रेपाळ, तालुका येवला येथे होणार आहे.