आशाताई बच्छाव
सुवर्णपदाची मानकरी कु. मुस्कान अत्तार
नाशिकरोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार :- वसुंधरा महाविद्यालयातील कु. मुस्कान बशीर अत्तार या विद्यार्थी नीला उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या मार्च -एप्रिल 2025 भूगोल विषयात उल्लेखनिय कामगिरी बद्दल सुवर्णापदक देण्यात आले. अभ्यासात सातत्य, मेहनत, जिद्द जर माणसात असेल तर यश हमाकास मिळते हे या विद्यार्थिनीने दाखवून दिले. तिचा हा अभ्यासातला प्रामाणिक पणा व चिकाटीच्या जोरावर तिची ही कामगिरी कौतुकास्पद असून इतरांनाही यातून बोध घेण्या सारखे आहे. तिच्या या यशात प्रा. हरिश्चंद्र तिपे सर व डॉ. प्रा. बापू राऊत सर यांच्या मार्गदर्शनाने साध्य झाले. महाविद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन






