Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यावर जलसंकट; अनेक गावे गेली पाण्याखाली, सर्व नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

अहिल्यानगर जिल्ह्यावर जलसंकट; अनेक गावे गेली पाण्याखाली, सर्व नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

60

आशाताई बच्छाव

1001983983.jpg

अहिल्यानगर, प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यावर जलसंकट; अनेक गावे गेली पाण्याखाली, सर्व नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. ओढ्यांना पूर आला आहे तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील माती वाहून गेली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील शेतजमिनी जलमय झाल्या असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यातील कौठा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी मोठा पाऊस सुरु आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाल्याने नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कांदा तसेच कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Previous articleवाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांने शेतीत अनोखा उपक्रम करीत ४० दिवसांत कमावले दोन लाखांचे उत्पन्न
Next articleशनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.