आशाताई बच्छाव
पाडळदेतील अल्पवयीन बालकाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना
मालेगाव राजेंद्र पाटील राऊत:- नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावी काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी शेतातील विहिरीवर असलेली इलेक्ट्रॉनिक मोटार बंद करण्याच्या निमित्ताने आदिवासी वस्तीतील समाधान माळी या अल्पवयीन युवकाला सोबत घेऊन गेलेल्या व्यक्तीने मारहाण करून त्याचा अमानूषरित्या खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण मालेगाव तालुका हादरला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार असे समजते की,काल शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी पाडळदे गावांतील सोमनाथ झिंजर नामक व्यक्तीने गावातल्या आदिवासी वस्तीतील सोमनाथ माळी या अल्पवयीन मुलास शेतात विहिरीवर असलेली इलेक्ट्रॉनिक मोटार बंद करून येऊन या निमित्ताने सोबत नेऊन त्या मुलाचा परस्पर मारहाण करून खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास यंत्रणेने या गुन्ह्यांतील मुख्य संशयित आरोपी सोमनाथ झिंजर यास ताब्यात घेतले आहे.पुढील पोलिस तपास सुरू आहे.