आशाताई बच्छाव
कै.प्रा.सूर्यकांत रहाळकर स्मृतिदिनानिमित्त १३ रोजी व्याख्यान
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
१९२३ ते आजपर्यंतच्या १०२ वर्षांच्या काळात नाशिक एज्युकेशन सोसायटीने अनेक स्थित्यंतरे अनुभवली.वेळोवेळी लाभलेले उत्साही, धैर्यशील, कर्तृत्ववान संस्थाचालक तसेच व्यासंगी आणि स्वतःला झोकून देऊन त्यागमय जीवन व्यतीत करणाऱ्या शिक्षकांमुळे आणि पुढे नामवंत व कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांमुळे संस्था प्रगतीकडे वाटचाल करू शकली.
माजी विद्यार्थी ते संस्था अध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून नाशिक एज्युकेशन सोसायटीशी जवळपास ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ संबंधित असलेले प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे १३ सप्टेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. परंपरांचे जतन करून संस्थेला आधुनिक दृष्टी प्रदान करण्याचे काम प्रा. रहाळकर सरांनी केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षणावर बोलू काही या विषयावर जेष्ठ विचारवंत मा.श्री. विवेक सावंत महाराष्ट्र नाॅलेज कार्पोरेशन लिमिटेड,(MKCL) व्यवस्थापकीय संचालक यांचे व्याख्यान सकाळी ९।४५ वा .परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन समोर, नाशिक येथे आयोजित केले आहे.आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ऍड. जयदीप वैशंपायन,कार्यवाह राजेंद्र निकम, सर्व कार्यकारी मंडळ सदस्य, शिक्षक मंडळ सदस्य यांनी केले आहे.