आशाताई बच्छाव
शिवसेना महिला दलित आघाडी जालना शहरप्रमुखपदी छाया कोळे यांची निवड
जालना, (प्रतिनिधी दिलीप बोंडे)- शिवसेना महिला दलित आघाडीच्या शहरप्रमुख पदी
छाया विष्णु कोळे यांची नियुक्ती शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अँड,
भास्कर मगरे यांनी नियुक्ती पत्राव्दारे केली.
छाया कोळे यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात दलित आघाडी
जिल्हाप्रमुख अँड. भास्कर मगरे यांनी म्हटले आहे की,आपण महिला शाखा
प्रमुख म्हणुन चांगले काम करुन महिलांचे संगठण वाढवुन तळागाळातील
माणसासाठी काम करत आहात त्या कामाची पक्ष स्तरावर दखल घेऊन शिवसेना नेते
तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या आदेशाने आणि जालना जिल्हा संपर्क
प्रमुख पंडित भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे,ए.जे. पाटील बोराडे
यांच्या सहमतीने आपली शिवसेना महिला दलित आघाडी जालना शहरप्रमुख पदी
नियुक्ती करण्यात येत आहे. महिला आघाडीच्या शहरप्रमुख छाया विष्णु कोळे
यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी शिवसेनेचे योगेश
रत्नपारखे, जय खरात, महिला आघाडीच्या चौधरी ताई आदींची उपस्थिती होती.
०००००००
-शिवसेना महिला दलित आघाडीच्या शहरप्रमुख पदी छाया विष्णु कोळे यांची
नियुक्ती शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अँड, भास्कर मगरे यांनी
नियुक्ती पत्राव्दारे केली.