आशाताई बच्छाव
सोयाबीन पिकाला फळधारणा न लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव …!
जळगाव (जा.) प्रकाश खंडागले :- खरंतर एका दाण्याची हजार दाणे करण्याची क्षमता ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर काही बियाणे कंपन्या उठल्याचे दिसुन येत आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील मौजे टाकळी पारस्कार, आसलगाव बाजार, खांडवी व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी फुले किमया (बालाजी) या सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र त्या सोयाबीनच्या झाडाला शेंगाच न लागल्यामुळे अनेक शेतकरी हैराण झालेले आहे.
मुळात शेतकरी मोला-महागईची बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्यानंतर त्या पिकाला तळहाताच्या फोळा प्रमाणे जपुन त्याची प्रचंड अशी मेहनत करुन त्यापासुन चांगले उत्पन्न काढु व दोन पैसे मिळवु अशी अपेक्षा करतो मात्र या ठिकाणी बोगस बी-बियाणे कंपनीमुळे शेतकऱ्याला मरणाची दार खुली होतांना दिसत आहे.
सदर ही बाब आज दिनांक ११ सप्टेंबर २०२५ ला काही शेतकऱ्यांनी व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी एकत्र येत शेतातील शेंगा न लागलेले सोयाबीनची झाडे घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे धाव घेतली.
त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांना शेतकऱ्यांनी आपल्या भावना सांगितल्या की आम्ही सोयाबीनची बियाणे कर्ज काढुन घेऊन त्याची भरपुर मेहनत करून लहानाची मोठी सुद्धा केली मात्र आज या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच न लागल्याने आम्ही जिवन जगायचे तरी कशे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालुन संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी,कृषी विभागाचे अधिकारी मिळुन पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी.
अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असा इशारा या वेळेस देण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.