आशाताई बच्छाव
भोकरदन येथील गणेश मंडळाच्या वतीने जंगी कुस्त्याचे आयोजन.
गजेंद्र लोखंडे तालूका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन येथे गणेश चतुर्थी पासून अकरा दिवस गणरायाची भक्ती गाणे पूजा केली जाते अशाच प्रकारे भोकरदन शहरांमध्ये बरेचसे गणेश मंडळे असून या गणेश मंडळाच्या अध्यक्ष यांच्या वतीने गणेश फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले आज रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर कुस्ती सामने आयोजित करण्यात आले होते यामध्ये लहान मंडळी पासून मोठ्याला पैलवानापर्यंत कुस्त्या लावल्या जात होत्या कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कुस्ती आखाड्यामध्ये महिलांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता व त्यांनी बक्षीस सुद्धा पटकावले होते यावेळी गणेश फेस्टिवल चे अध्यक्ष मुकेश भाऊ चिने मंडळातील इतर सदस्य व गणेश मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन नारायण जिवरग सर यांनी केले शंभर रुपयापासून ते 500 ते हजारो रुपयांपर्यंत या ठिकाणी कुस्त्या लावण्यात आल्या होत्या कुस्त्या खेळण्यासाठी पहिलवान दूर दूर वरून या ठिकाणी आले होते मैदानामध्ये लहान मोठे असे पहिलवान आपले डावपेच मारून कुस्ती पटकावत होते पंचाच्यावतीने कुस्ती पटकावणाऱ्या पहिलवानास पंच कमिटी समोर नेऊन बक्षीस दिले जात होते