Home बुलढाणा पत्नीने पोटातील बाळ पाडल्याची वार्ता कानी पडली.. अन् पतीने विषारी औषध प्राशून...

पत्नीने पोटातील बाळ पाडल्याची वार्ता कानी पडली.. अन् पतीने विषारी औषध प्राशून मृत्यूला कवटाळले! नेमकी काय आहे घटना ?

66
0

आशाताई बच्छाव

1001940415.jpg

पत्नीने पोटातील बाळ पाडल्याची वार्ता कानी पडली.. अन् पतीने विषारी औषध प्राशून मृत्यूला कवटाळले! नेमकी काय आहे घटना ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा मोताळा तालुक्यातील घटना पत्नीने पोटातील बाळ पाडल्याची वार्ता कानी पडल्याने बाहेरगावावरून पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पती व सासरच्या मंडळीत वाद होऊन पतीने विषारी औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याची घटना मोताळा तालुक्यातील ग्राम लपाली येथे 8 सप्टेंबरला समोर आली आहे.बादल हवसु मंडाळे, रा. कुंभारी ता. जामनेर जि. जळगाव असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी रूपाली बादल मंडाळे, संजय जयराम भवर, लिलाबाई संजय भवर, अक्षय संजय भवर सर्व रा. लपाली ता. मोताळा, जि. बुलढाणा या आरोपी विरुद्ध कलम 108,3 (5) भा. न्या.स 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
इंदुबाई मुके रा. कुंभारी यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली. मृतक बादल याची पत्नी रुपालीने पोटातील बाळ पाडले अशी माहिती इंदूबाईचा भाचा यांच्याकडून माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच बादल यांनी लपाली गावी जाऊन पत्नी रुपालीला घेऊन येतो सांगून जामनेर येथून लपाली येथे आला होता. त्यानंतर फिर्यादी इंदुबाईंचा पुतण्या श्रीराम जोशी याला फोनवरून माहिती पडले की, बादल मंडळे हा विषारी औषध घेऊन मृत्यू पावला आहे. गावात या प्रकरणी विचारपूस केली असता, लपाली येथील गोपाल दगडू मंडाळे यांनी बादल व त्यांची पत्नी, सासू-सासरे यांच्यात वाद झाल्याचे सांगितले. या त्रासाला कंटाळून बादल यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Previous articleदुचाकीवरून मंगळसूत्र चोरले.. मग त्यांना एलसीबीने घेरले ! – बजाज पल्सर जप्त, 2 गुन्ह्यांची उकल !
Next articleरात्री अवैध वाळूच्या ट्रकसह 1520,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here