आशाताई बच्छाव
वनसगाव विद्यालयाच्या मुलींच्या दोन खो खो संघांची जिल्हा पातळीवर निवड
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे
रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या १४ व १७ वर्ष वयोगटाच्या खो-खो संघांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्हा पातळीवर मजल मारली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक व निफाड तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने के.के.वाघ विद्याभवन,भाऊसाहेबनगर येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघांनी बाजी मारली आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य आर के सोनवणे व क्रीडा विभाग प्रमुख अरुण वाघ यांनी दिली आहे.
वनसगाव विद्यालयाने १७ वर्ष वयोगटात झालेल्या अंतिम सामन्यात विंचूर विद्यालयाचा तर १४ वर्ष वयोगटातील अंतिम सामन्यात चांदोरी विद्यालयाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
१४ वर्ष वयोगटात श्रावणी जेऊघाले,श्रावणी मुरलीधर शिंदे,प्रियंका शिंदे,गौरी शिंदे,प्रियंका वाघ,अलिशा शिंदे,श्रावणी संतोष शिंदे,तन्वी सचिन शिंदे, सिद्धिका गोसावी,तन्वी शंकर शिंदे,स्वामिनी शिरसाठ,कल्याणी चौधरी या खेळाडूंनी तर १७ वर्ष वयोगटात ईश्वरी निफाडे,अनुज्ञा कुशारे,स्वप्नाली शिंदे,श्रेया शिंदे,आदिती जेऊघाले,समीक्षा जेऊघाले, आकांक्षा सुरासे,सानिका शिंदे,पुजा पवार,मैथिली निकम,हर्षदा शिंदे यांनी बहारदार खेळाचे प्रदर्शन करून विजय संपादन केला. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख अरुण वाघ व क्रीडाशिक्षक दिपक गायकवाड ,सचिन ठुबे यांचे मार्गदर्शन लाभले.
वनसगाव विद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ गुंजाळ, वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळ, स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक शिक्षण सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, विशाखा समिती,पत्रकार संघ,माजी विद्यार्थी संघ,पालक ,प्राचार्य आर.व्ही.सोनवणे,पर्यवेक्षक बी.एफ.भवर ,सर्व सेवक वृंद व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.