आशाताई बच्छाव
जालना जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालक विरोधात राबविली मोहीम दंड वसुल आणि पालकांना दिली समज
जाफराबाद जालना प्रतिनिधि मुरलीधर डहाके
जालना शहर व जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांच्या विरोधात राबवली विशेष मोहीम एकूण २०९ अल्पवयीन वाहन चालक मिळून आल्याने ६,३८,१००/- रुपये आकारण्यात आला दंड व पालकांना दिली समज.
जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकाकडून अपघात होणे त्यामध्ये अल्पवयीन चालक स्वतः जखमी होणे व इतरांना जखमी करणे अशा प्रकारची माहिती व तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आल्या होत्या त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री अजयकुमार बंसल सर ,अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली आज दिनांक १०/०९/२०२५ रोजी जालना शहर व जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली असून सदर मोहिमेसाठी समन्वयक म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे शहर वाहतूक शाखा यांना नेमले होते.जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी ठाणेदार व सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सकाळपासूनच शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग व महत्त्वाचे चौक या ठिकाणी कर्मचारी नेमून अल्पवयीन चालकांचा शोध घेतला असता जिल्ह्यामध्ये एकूण २०८ अल्पवयीन चालक वाहने चालविताना मिळून आले सदरची वाहने व अल्पवयीन मुले यांना पोलीस स्टेशन व शाखा कार्यालय या ठिकाणी आणून त्यांच्या पालकांना बोलवण्यात आली वाहन चालक यांना मोटार वाहन कायद्याबाबत मार्गदर्शन करून परत अल्पवयीन असताना वाहन न चालवण्याबाबत समाज देण्यात आली तसेच नमूद अल्पवयीन पालकांना सुद्धा योग्य ती समज देण्यात आली .सदर कारवाई मध्ये एकूण ६,३८,१००/- रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
यापुढे कोणताही अल्पवयीन वाहन चालविताना मिळून आल्यास त्याच्या पालका विरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात येईल व दोषारोपत्र मा.न्यायालयात दाखल करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी अशा सूचना दिल्या.






