आशाताई बच्छाव
शिक्षणः प्रश्न अनेक-ऊत्तर एक
ज्ञानोबा वरवट्टे गौरवग्रंथावर नांदेड येथे परिसंवाद संपन्न!
——————————————————————–
शिक्षण व शिक्षकांवरील अरिष्टावर मंथन!
———————————————————————
शिक्षण क्षेत्रातील अरिष्ट हे केवळ या क्षेत्रातील नसून
शिक्षण, रोजगार व आर्थिक विकास यांच्या तुटलेल्या सांध्यातील आहे – कॉम्रेड अजित अभ्यंकर यांचे प्रतिपादन!
———————————————जालना-वसंतराव देशमुख
दिनांक १०/०९/२०२५
मराठवाडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे यांच्या सेवापुर्ती निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या शिक्षणः प्रश्न अनेक-ऊत्तर एक गौरव ग्रंथवर नांदेड येथे परिसंवाद संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील अरिष्ट हे केवळ या क्षेत्रातील नसून
शिक्षण, रोजगार व आर्थिक विकास यांच्या तुटलेल्या सांध्यातील असल्याचे प्रतिपादन कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केले.
पीपल्स कॉलेज नांदेडच्या नरहर कुरुंदकर सभागृहात संपन्न झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत विश्वासराव होते. कामगार नेते काॅम्रेड अजित अभ्यंकर आणि राजकीय विश्लेषक प्रा अशोक सिध्देवाड भाष्यकार तर मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, पुस्तकाचे संपादक प्रो डाॅ. मारोती तेगमपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांनी केले. एका तासाच्या आपल्या भाषणात अभ्यंकर यांनी शिक्षण क्षेत्रातील भयाण वास्तवाचा उहापोह केला. देशात बेरोजगारीचा दर 8% ते 9% असून त्यामधे शिक्षित बेरोजगारांचे प्रमाण जास्त असून ही बाब असल्याचे चिंताजनक अभ्यंकर म्हणाले. कायम कर्मचाऱ्यांची संख्या कमी कमी होत आहे. राज्य सरकारच्या विविध अस्थापनेत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून ऐंशी टक्के कर्मचारी कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात आले आहेत. प्रगत देशात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात सात ते तीस टक्के असून आपल्या देशात हे प्रमाण दिड टक्क्यापेक्षा थोडे जास्त असल्याचे सांगून देशात क्रॉनी कॅपिटलिजम तर आहेच परंतु देशाचे सरकारच क्रॉनी असल्याचे ते म्हणाले. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रा अशोक सिध्देवाड परिसंवादात भूमिका मांडताना म्हणाले की, ब्रिटिश देशातून जाणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर देशातील सर्व नागरिकांना विकासाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. शिक्षण, आरोग्य सुविधा पुरविणे सरकारची जिम्मेदारी असताना आपल्या देशातील सरकार मात्र आपल्या या घटनादत्त जिम्मेदारी पासून पळ काढत आहे. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे आणि पुस्तकाचे संपादक प्रो डॉ. मारोती तेगमपुरे यांची समयोचित भाषणे झाली. सूर्यकांत विश्वासराव यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन आनंद कर्णे यांनी केले.