आशाताई बच्छाव
निफाड ला माणुसकी फाउंडेशन च्या वतीने ४५ गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
निफाड येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद सिताराम निकाळे (सर) वनसगाव यांच्या स्मरणार्थ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षक दिनाचे औचित्य साधत श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था निफाड येथे जिल्ह्यातील निवडक व उपक्रमशील ४५ शिक्षकांना आदर्श गुणवंत शिक्षकांना मा अध्यक्ष नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघ शिवाजी दादा ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रपती पदक विजेते नाशिक पोलिस परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर साहेब यांच्या शुभहस्ते शिक्षक बंधु भगिनींना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा मुख्याध्यापक पी एस निकाळे यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील राहुल सोनवणे यांनी केले.पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा माणुसकी फाउंडेशन च्या वतीने सागर निकाळे व टीमच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी जिल्हा दूध उत्पादक संघाचे मा अध्यक्ष शिवाजी ढेपले होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून लेखक , साहित्यिक व राष्ट्रपती पदक विजेते डॉ बी जी शेखर साहेब मा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप,हभप ज्ञानेश्वर माऊली शिंदे, शिक्षक नेते संजय चव्हाण, जेष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे, रासाकाचे मा चेअरमन शंकरराव कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता काका रायते , नामदेवराव गायकवाड, संपतराव रोटे, शौर्य रणरागिनी न्यूज संपादिका गायत्री लचके, माणुसकी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे, ॲड शेखर देसाई,मा प्राचार्य सी डी रोटे सर,पोलीस पाटील राहुल सोनवणे, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर,माणिक कुशारे सर आदींच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षकांना फेटा बांधून शाल ,पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी दादा ढेपले, शिक्षक नेते संजय चव्हाण ,कार्यक्रमासाठी विशेष सन्मानार्थी प्राचार्य सी डी रोटे, रामकृष्ण हरी साधना आश्रमाचे ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे, माणुसकी फाउंडेशन च अध्यक्ष सागर निकाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शिक्षण क्षेत्रात ३४ वर्ष सेवा करुन सेवानिवृत्त झालेले वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे सर यांचा राष्ट्रपती पदक विजेते डॉ बी जी शेखर साहेब मा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर साहेब यांनी आपल्या मनोगतात गुणवंत शिक्षकांना शुभेच्छा देताना म्हटले की, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून जीवनाचा मुख्य मार्गदर्शक आहे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे.माणुसकी फाऊंडेशन च्या वतीने मा मुख्याध्यापक पी एस निकाळे सर यांच्या स्मरणार्थ शिक्षक बंधु – भगिनींचा सन्मान आज माझ्या हस्ते होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच रामकृष्ण हरी साधना आश्रमाचे ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक हा देशाचा कणा आहे, समाजप्रबोधन करत असताना मी एकही रुपया घेत नसुन यापुढे ही किर्तनाचा एक रुपया ही घेणार नाही असे प्रतिपादन केले.शिक्षक नेते संजय चव्हाण सर यांनी शिक्षक हा दिवा असुन शिक्षिका पणती असल्याचे सांगितले.यावेळी माणुसकी फाउंडेशन च्या वतीने डॉ बी जी शेखर साहेब यांचा संस्थापक पत्रकार सागर निकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुहास सुरळीकर यांनी केले तर शेवटी सागर निकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे
अनिल कुंभार्डे- महावीर विद्यालय लासलगाव,अनिलसिंग परदेशी- न्यू इंग्लिश स्कूल आंबे दिंडोरी, मुकुंद ताकाटे सर.के .आर.टी हायस्कूल,मौजे सुकेणे, मुख्याध्यापक दिलिप कोथमीरे सर डोंगरगाव, डॉ.सुजाता गडाख-के टी एच एम कॉलेज नाशिक, पांडुरंग गोविंद देवरे जि प प्रा शाळा राजोळे वस्ती,नवनाथ डुंबरे -जि.प.मॉडेल स्कूल सारोळे थडी, नितीन ठुबे- क भा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरे ता.नांदगाव,प्राचार्य श्री.प्रदीप सांगळे -कनिष्ठ महाविद्यालय शिवरे, बाजीराव कमानकर शाळा भेंडाळी,बाबासाहेब आवारे जिल्हा परिषद शाळा वाकद, बाळासाहेब आडसरे- आरुढ विद्यालय म्हाळसाकोरे, सौ.मंदाकिनी भागवत जि .प शाळा बोकडदरे, रतन शेळके जिल्हा परिषद शाळा रुई, रवींद्र गीते परमपूज्य तुकाराम बाबा विद्यालय खेडले झुंगे,राजेंद्र परदेशी मुख्याध्यापक जि प शाळा मोहाडी, विलास फड जि प शाळा विष्णुनगर, श्रीमती.मनीषा सानप- श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी,ता.सिन्नर, सौ.करुणा दिपक गायकवाङ- न्यू इंग्लिश स्कूल,चांदोरी सुदर्शन जाधव अभिनव बाल विकास मंदिर,येवला,सुरेंद्र जगन्नाथ पगारे -अधीक्षक आनंद विद्यार्थी आश्रम,निफाड सौ.ज्योती कुमावत -निफाड इंग्लिश स्कूल, सोमनाथ मापारी जि प शाळा उगाव, उमेश प्रभाकर कुलकर्णी नवीन इंग्रजी शाळा ओझर, दिपक कडू हिरे जि.प.प्रा.शाळा-सरोदेवस्ती मालेगाव, श्री.राजेंद्र दुनबळे – मुख्याध्यापक जि.प.शाळा आहेरवाडी ता.येवला के.एम.गाजरे- मुख्याध्यापक ङी.आर.भोसले विद्यालय देवगाव, आनंदा दत्तात्रय राजगुरू, मुख्याध्यापक जि. प. शाळा वनसगाव, कुंदन कुमार जाधव श्री.छञपती शिवाजी विद्यालय वनसगाव, सौ.रोहिणी जानकीराम धारराव, जि प शाळा सारोळे खुर्द, पोपट आप्पा मोरे जि. प शाळा ,पिंपळस, वाल्मीक जगन्नाथ खापरे जि प शाळा वरद विनायक वस्ती,नांदुर्डी, प्रा शंकर बन्सी गायकवाड कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय ,निफाड, कारभारी गावंडे जि .प शाळा ,देवगाव,सौ भारती सुभाष उगले, सौ.अश्विनी प्रसन्न पवार एन.व्ही.पी कॉलेज, लासलगाव, श्री.एम.पी.आहीरे सर, श्री.भालचंद्र सुर्यवंशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय उगाव, श्री.नवनाथ खरे, श्री किरण शिंदे आदींना सन्मानित करण्यात आले.