आशाताई बच्छाव
शासनाच्या नाविन्यपूर्ण लक्ष्मी मुक्ती योजना उपक्रमाचे व अनुसूचित जमाती करता विशेष शिबिराचे आयोजन पवनी येथे
संजीव भांबोरे
भंडारा- पवनी तहसील च्या वतीने शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजना व अनुसूचित जमाती करिता विशेष शिबिराचे आयोजन शासनाचे वतीने पवनी तहसील च्या वतीने करण्यात येत आहे. त्याच्यात एक भाग म्हणून 9 सप्टेंबर सातबारा वर केवळ एक नाव असलेल्या पुरुष भोगवटदराची यादी तयार करणे, 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2025 भोगवट दारात भेट देऊन त्यांना सातबारावर त्याचे पत्नीचे नाव दर्ज करण्याकरिता अर्ज सादर करण्यास प्रोत्साहित करणे, 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आवश्यक पुराव्यासह भोगवटदार कडून अर्ज प्राप्त करून घेणे, 14 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत प्राप्त अर्ज व पुराव्यांची तपासणी करणे प्राप्त अर्जदाराचे बयान नोंदविणे, तलाठी, मंडळ अधिकारी ,यांना प्रकरणे पुढील कार्यवाहीस्तव तहसील कार्यालय सादर करणे, 17 सप्टेंबर 2025 ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर जाहीरनामा प्रसिद्धी करणे,
27 सप्टेंबर 2025 ला लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत स्त्रियांचे हक्क सुरक्षित रहावे याकरिता आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ उताऱ्यात स्वतःबरोबर पत्नीचा सह हिस्सेदार म्हणून फेरफार नोंदणी बाबत प्रक्रिया पार पाडणे व जनजागृती करणे, 28 सप्टेंबर 2025 ला संबंधितताला त्यांच्याकडून गावनिहाय अर्ज प्राप्त करून घेणे, 29 सप्टेंबर 2025 ला सदर अर्जातील आवश्यक कागदपत्राची छाननी करणे, 30 सप्टेंबर 2025 ला लक्ष्मी मुक्ती योजनेचे अर्जाला आदेश पारित करून मान्यता प्रदान करणे ,1 आक्टोंबर 2025 ला तहसील कार्यालय मध्ये विशेष शिबिराचे आयोजन करून लक्ष्मी मुक्ती योजनेच्या आदेशाचे वाटप करणे, 2 आक्टोंबर 2025 ला मौजा गोंडी शिवनाळा तालुका पवनी येथे अनुसूचित जमाती करिता विशेष शिबिर अंतर्गत विविध प्रमाणपत्र वाटप व शासकीय योजनांची माहिती देणे संबंधात शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता सातबारा उताऱ्यावर पुरुषांच्या नावासोबत पत्नीचे नाव सह हिस्सेदार करिता नाव चढविण्याकरता संबंधित तलाठी यांच्याकडे अर्ज भरून देणे आवश्यक आहे, व त्या अर्जासोबत रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड, शेतीचा सातबारा, पोलीस पाटील यांच्या कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला व पतीचे संमती पत्र जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हमीपत्र नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत व सातबारा नाव चढविण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा देणे आवश्यक आवश्यक आहे. याकरिता पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचेआवाहन पवनी येथील तहसीलदार किरण वागस्कर यांनी केलेले आहे.