आशाताई बच्छाव
जनता विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक ५ सप्टेंबर रोजी जनता हायस्कूल जालना येथे भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञानी व महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्गांनी आपल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.
या प्रसंगी शाळेतील शिक्षकांचा गुलाब पुष्प भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत त्यांचा आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी सर्वांना मार्गदर्शन करत “शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत” असा संदेश दिला. सदरील कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार, पवन जोशी, संतोष गंडाळ,प्रभाकर सावंत,बाबासाहेब पवार,विष्णू पवार, अमोल देशमुख,राजू डोंगरे,श्रीमती स्वाती सोनवने, सुधीर वाघमारे,संदीप तोडावत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते