आशाताई बच्छाव
माहोरा तान्हाजी नगर येथील गणपती विसर्जन ऐकतेचा संदेश देत आनंदात संपन्न
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 06/09/2025 जाफराबाद तालुक्यातील माहोरा या गावी तान्हाजी मित्र मंडळाने माहोऱ्याचा विघ्नहर्ता या नावाने गणपती विराजमान केले होते. सलग दहा ते अकरा दिवस सकाळ संध्याकाळ आरती घेत असत आरतीसाठी सामाजिक सलोखा साधून सर्व समाजातील महिला आणि पुरुष हजर राहत असत. गणपती समोर दररोज आरती झाल्यानंतर स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी त्यामध्ये संगीत खुर्ची,लिंबू चमचा सारखे खेळ खेळून आनंद साजरा करायचे. दि. 4 सप्टेंबर गुरवार दिवशी महाप्रसाद आयोजन केले होते सर्व समाजातील मिळून सर्वांनी एकोप्याने परिश्रम घेऊन भंडारा सुद्धा यशस्वी करून एकोप्याचे दर्शनी घडविले.
दि 6 शनिवार गणपती विसर्जन दिवशी सर्व समाजातील हजर राहून आरती घेऊन विसर्जनाची तयारी केली गणपती विसर्जनासाठी मिरवणूक काढून ढोल ताश्याच्या गजरात आनंदाने नाचून गाऊन महिलांनी फुगडी खेळून गणरायाला निरोप दिला यामध्ये मिरवणूक निघाल्यापासून ते विसर्जित होईपर्यंत सर्व समाजातील महिला आणि पुरुष गणराया सोबत होते.त्यामुळे सर्वात मोठे ऐकतेची प्रचिती माहोऱ्याचा विघ्नहर्ता या ठिकाणी पाहावयास मिळाळी.