आशाताई बच्छाव
निवाणा गावात भयानक हल्ला, तरुणाची निर्दय हत्या, १२ जणांविरुद्ध खुनासह गंभीर गुन्हा दाखल
संग्रामपूर बुलढाणा स्वप्नील देशमुख
संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे गुरुवारी रात्री दहशत पसरवणारी घटना घडली. प्रज्वल सुभाष मोहे वय २५ रा.निवाणा यांच्या तोंडी फिर्यादीनुसार, गावातील सोळंके आणी पवार गटातील १२ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्या घरात घुसखोरी करत नातेवाईकांना मारहाण केली. यावेळी “सोपान दिगंबर सोळंके याच्यावर असलेली विनयभंगाची केस मागे घ्या” असा दम देत आरोपींनी प्रज्वलचे भाऊ ऋषिकेश सुभाष मोहे वय २७ याच्यावर धारदार हत्यारांनी जीवघेणा हल्ला करून त्याला ठार केले. यात फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना गंभीर मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे सपोनि राजेंद्र पवार करीत असून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहेत. या घटनेमुळे निवाणा गावात एकच खळबळ उडाली आहे.