Home गुन्हेगारी मेशी येथे भरदिवसा धाडसी चोरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास

मेशी येथे भरदिवसा धाडसी चोरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास

597
0

आशाताई बच्छाव

1001814907.jpg

मेशी येथे भरदिवसा धाडसी चोरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास
देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- मेशी ता.देवळा येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज व तीन तोळे सोने लंपास परिसरात घबराटीचे वातावरण.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सौंदाणे – देवळा रस्त्यावर मेशी शिवारात नामदेव वेडू शिरसाठ हे आपल्या शेतात राहतात रविवार( दि.१०) रोजी सकाळी दहा वाजता शिरसाठ हे वाखारवाडी येथे आपल्या बहिणीकडे कुटुंबासमवेत घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले असता तेथून तीन वाजता घरी आले तर घराचे कुलूप तोडून दरवाजाची फक्त कडी लावलेली दिसली .शिरसाठ यांनी दरवाजा उघडून बघितला तर घरातील कपाट उघडून सर्वच सामान अस्ताव्यस्त पडलेले होते त्यात दोन लाख वीस हजार रुपये रोकड रक्कम व तीन तोळे सोने असा ऐवजचोरीला गेला आहे शिरसाठ यांनी लगेच आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलवून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली त्यानंतर देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता तात्काळ देवळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील,पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील, हवालदार संदीप चौधरी हे करीत आहेत
मागील महिन्यात अकरा तारखेला देखील मेशी गावात धाडसी घरफोडी झाली होती त्या घटनेचा शोध लागत तोच ही मोठी घरफोडी झाल्याने पोलिसांसमोर घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here