Yuva maratha news
भंडारा पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची राज्यात प्रथमच प्रसंशा- पूर्व विभागात दुसरे स्थान
संजीव भांबोरे
भंडारा -महाराष्ट्र राज्य पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन स्पर्धेत भंडारा जिल्ह्याने उल्लेखनीय मिळविले असून राज्यात पूर्व विभागात दुसरे क्रमांकवर आपले स्थान निश्चित केले आहे .अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मूल्यांकनात भंडारा विभागाने आपले तांत्रिक कौशल्य नव्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापर आणि प्रशासकीय सुसूत्रता मुळे ही ओळख निर्माण केली आहे. भंडारा जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या विविध उपाय योजना मुळे हा मान मिळवता आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक उपकरणांची खरेदी जिल्ह्यातील शाडो बुधची संख्या कमी करून बिनतारी दळणवळण सुधारण्यात आले. भागडी, तुमसर येथे तात्पुरते रिपीटर उभारणी करून अखंड दळणवळण साखळी निर्माण करण्यात आली.
पोलनेट फेज 2 वरील तांत्रिक अडथळे दूर करून यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. स्थानिक पातळीवर संच व रिपीटर तसेच विजेरीची खरेदीने बरीच तांत्रिक अडचण दूर करण्यात आलेली आहे .जिल्ह्यात असलेले एकमेव रिपीटर भिलेवाडा येथे वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. नवीन रिपीटर भागडी उभारणीबाबत तांत्रिक तपासणी झाली असून प्रशासकीय पूर्तता करण्यात आलेली आहे. पोलीस मुख्यालयातत नव्याने निर्माण केलेले दिशा प्रकल्पाला लागणारे तांत्रिक साहित्य बाबत वेळीच कार्यवाही घेऊन पूर्तता करण्यात आलेली आहे.
सार्वत्रिक लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचे दरम्यान बाहेरील राज्यातून प्राप्त झालेले संच तसेच वाकी टाकीला लागणारे भंडारा जिल्ह्यातील प्रोग्रामिंग करून जिल्ह्यातील दळणवळण प्रस्थापित करण्यात आलेले होते.
या सर्व उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी मुळे भंडारा जिल्ह्याला पूर्व विभागातील 17 घटकापैकी दुसरे क्रमांक प्राप्त झालेले आहे .हि बाब जिल्हाकरिता अत्यंत अभिमानास्पद ठरलेली आहे .या अनुषंगाने अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे दीपक पांडे यांच्या हस्ते पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान भंडारा घटकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र सुधाकर मांजळे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पोलीस दळणवळण विभागाच्या या
उल्लेखनीय कामगिरी बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केलेले आहे.