आशाताई बच्छाव
श्रीक्षेत्र पाचोरे बु येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे
श्रीक्षेत्र पाचोरे बुद्रुक तालुका निफाड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शनिवार ९/८/२०२५ ते शनिवार १६/८/२०२५ (गोपाळकाला) पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हनुमान मंदिर येथे आयोजित केला आहे. तरी या पवित्रमय धर्म सोहळ्यास सर्व भाविकांनी तनःमनः धनाने सहकार्य करून ज्ञानदान व श्रवण सुखाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व माऊली भजनी मंडळ पाचोरे बुद्रुक तालुका निफाड यांनी केले आहे.
व्यासपीठ चालक ह.भ.प. गोरख महाराज वैराळ, ह.भ.प. अमोल महाराज जाधव, आळंदी देवाची.आशिर्वाद: वै.ह.भ.प. वाल्मिक महाराज कदम, बहुरुपी बाबा, लासलगांव, धोंडीराम बाबा उगलमुगले, भिमराज म. शिंदे हरिपाठ नेतृत्त्व : श्रीसंत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची, जय जनार्दन अनाथ आश्रम लासलगांव माऊली भजनी मंडळ, पाचोरे बु ।।
दैनंदिन कार्यक्रम
व्यासपीठ चालक आमोल म. जाधव, आळंदी देवाची, पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ वा. ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प.अमोल महाराज जाधव व त्यांचे विद्यार्थी (आळंदी देवाची) सायं ५ ते ६ हरिपाठ व रात्री ९ ते ११ वा. हरिकिर्तन.
किर्तनाची रुपरेषा पुढीलप्रमाणे —
शनिवार दि.९/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.अर्जुन महाराज मोटे यांचे कीर्तन,रविवार दि.१०/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. भागवताचार्य अमोल म. घुगे, सोमवार दि.११/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.अशोक महाराज इलग शास्त्री, मंगळवार दि.१२/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.साध्वी वैष्णवीताई सरस्वती यांचे कीर्तन, बुधवार दि.१३/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर,गुरुवार दि. १४/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. शारदाताई सुर्यवंशी नाशिक, शुक्रवार दि.१५/८/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.विक्रांत महाराज पोंडिकर, शनिवार दि. १६/८/२०२५सकाळी नगर प्रदक्षिणा होईल,प.पु.ह.भ.प.स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे पंचवटी नाशिक यांचे स.१ ते ११ वा. काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.गायनाचार्य व वादक ह.भ.प. कार्तिक महाराज जाधव ह.भ.प.बाळु बाळू महाराज कुलकर्णी,ह.भ.प.गोरख महाराज वैराळ, ह.भ.प. सुदर्शन महाराज राऊत.आयोजक- माऊली भजनी मंडळ, पाचोरे बु।। ठिकाण : हनुमान मंदिर, पाचोरे बु।।, ता. निफाड
चोपदारः ह.भ.प. शिवाजी म. नागरे, ह.भ.प. गणपत म. नागरे विणेकरीः ह.भ.प. रमेश म. गिते, ह.भ.प. सोपान म. गांगुर्डे, ह.भ.प. विलास म. जोशी, मोलाचे सहकार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जय हनुमान, स्वयंशाखा, पाचोरे बु, श्रीकृष्ण ग्रुप पाचोरे, जय मल्हार ग्रुप, चबळ खोर मित्र मंडळ, जिजामाता ग्रुप दिपक साऊंड सिस्टीम, वाकी व समस्त ग्रामस्थ, पाचोरे बु।।






