आशाताई बच्छाव
भुसावळ येथे पर्यावरणाच्या संतुलनासाठी सीड बॉल उपक्रम संपन्न
अलका पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ शलाका कुलकर्णी यांचा पुढाकार
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधत विठ्ठल रखुमाई आध्यात्मिक विचार मंच सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच ब्राह्मण महासंघ सदस्या सौ शलाका निलेश कुलकर्णी भुसावळ यांनी महिलांचे संघटन व पर्यावरण संतुलनासाठी सिड बॉल तयार करणे. हा उपक्रम राबवत त्याची माहिती लहान मुलां सोबत महिलांना ही दिली. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा कालावधी झाडे लावण्यासाठी सर्वोत्तम कालावधी मानला जातो. कारण या काळात मातीत पुरेसा ओलावा झालेला असल्या कारणाने झाड वाढण्यास मदत होते.अनेकांना झाड लावण्याची त्याचे संगोपन करण्याची आवड असते,पण बऱ्याचदा जागे अभावी झाडे लावता येत नाहीत.म्हणूनच या सिड बॉल तयार करणे. या उपक्रमात विविध खत मिश्रित मातीत गोकर्ण,वैजयंती ,जांभूळ,सीताफळ, पेरू यांसह विविध फुले ,फळे,भाज्या यांच्या बिया मातीत टाकून त्यापासून छोटे छोटे सिड बॉल तयार करण्यात आले. हे बॉल आपण रस्त्यांनी जाताना किंवा प्रवासात असताना ओसाड जागेतील मातीत टाकले, तर मातीशी एकरूप होऊन याचे सुंदर रोप व रोपांचे झाडात रूपांतर होऊन पर्यावरण समतोलासाठी छोटी मदत होईल.
या कार्यक्रमात महिलांना घरबसल्या नोकरी साठी असणारी संधी यांचे सखोल मार्गदर्शन स्टेट बँक ऑफ इंडिया भुसावळ शाखेचे मॅनेजर श्री देवेंद्रजी चौधरी यांनी केले.तसेच ज्या महिलांचे घरगुती व्यवसाय आहेत.त्या व्यवसायाची माहिती व आपण ही वेळ काढून छोट्या व्यवसायापासून सुरुवात करत तो कसा वाढीस न्यावा याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले.तसेच महिलांना आर्थिक बचतीसाठी व एकत्र येण्यासाठी मासिक भिशी सुरू करण्याचा उपक्रम राबवणार असल्याची माहिती ही देण्यात आली.हा कार्यक्रम अलका पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाला सुपर वुमन ग्रुप च्या किरण महाजनी, कविता पाटील ,जयश्री सोनार ,दामिनी विनंते ,दुर्गा सहारे ,शारदा विनंते, रूपाली घुले, साक्षी कुलकर्णी,ममता चौधरी, अलका पाठक ,शलाका कुलकर्णी ,कांचन बागुल, प्रियांका कुलकर्णी, हेमलता बागुल ,सौ पाटील ताई, चौधरी ताई, मन्विता सोनार, कार्तिकी विनंते , वल्लभ कुलकर्णी, गीतेश पाटील, समीक्षा बागुल हे बाल गोपाळ ही उपस्थित होते.