Home नांदेड नागपूरात पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न.

नागपूरात पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न.

111
0

आशाताई बच्छाव

1001753850.jpg

नागपूरात पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नागपूर:
संत्रा नगरी नागपूर मध्ये कु. दिपाली व कु. अंजली राठोड अवघ्या १३ व १६ वर्ष वयात जैविकशेती, आरोग्याच्या समस्या,कारणे व उपाययोजनेवरील उपयोगी, माहीतीपूर्ण यशस्वी प्रयोगानंतर लिहीण्यात आलेल्या वसंत बहार(VASANT BAHAR :CARVING THE LIFE WITH HEALTH या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन झाले.. सुप्रसिद्ध कृषि शास्त्रज्ञ व ऍग्रो व्हिजनचे मुख्य सल्लागार मा.डॉ.सी.डी.मायी सर यांच्या शुभहस्ते समग्र क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची प्रतिमा पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे अप्पर आयुक्त (विकास) मा.कमलकिशोर फुटाणे, मा.दिगांबर चव्हाण आदिवासी उपायुक्त,नागपूर यांचीही विशेष उपस्थिती होती.डॉ. प्रवीण कुमार वुतला, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, क्षेत्रीय जैविक एवं प्राकृतिक खेती केंद्र, नागपुर, कृषि एवं किसान कल्याण विभाग, भारत सरकार यांचीही उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर नगरीचे नायक मा.आत्माराम चव्हाण,कारभारी मा.अॕड.बद्रीप्रसाद चव्हाण होते. या कार्यक्रमासाठी खास प्रमुख पाहुणे म्हणून व ज्यांनी वसंत बहार या इंग्रजी पुस्तकाला प्रस्तावना लिहीणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी साहित्यिक प्राचार्य डॉ.दिनेश सेवा राठोड आवर्जून उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमात बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणारे पारशिवनीचे क्रियाशिल संवर्ग विकास अधिकारी मा.सुभाष जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी श्रीपतभाऊ राठोड द्वारा बालक आणि पालक यांना केंद्रस्थानी ठेवून लिहीलेल्या आमची शाळा व पालकांसाठी क्रांतीगीत या दोन गीतांचे भिंतीपत्र प्रकाशित करण्यात आले.आणि सत्यक्रांती या १०१ क्रांतीकारी कविता संग्रहाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. सर्वच मान्यवरांद्वारा परसबाग निर्मिती व पुस्तकांच्या लेखन उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे सर्वच शाळामध्ये वसंत बहार हे पुस्तक पोहचले पाहीजे यासाठी शिक्षण विभागांच्या वरिष्ठ अधिकांऱ्यासोबत चर्चा करण्याचे मनोगत अप्पर आयुक्त (विकास) मा. कमलकिशोर फुटाणे यांनी आवर्जून प्रतिपादन केले. याप्रसंगी बाल लेखिका कु. दिपाली व कु. अंजली श्रीपत राठोड यांचे इंग्रजी व हिंदी भाषेतील मनोगत त्याचप्रमाणे सत्यक्रांतीचे लेखक श्रीपतभाऊ राठोड यांचे विचार आणि क्रांतीकारी कवितांचे सादरीकरण झाले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन सौ. जयश्रीताई श्रीपत राठोड केले आणि परसबाग निर्मिती हे गीत सादर केले. तर आभार कु. दिपाली राठोड यांनी मानले.क्रार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर समाजबांधवाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंदन शेरे,मनोज राठोड,पिरूसिंग राठोड,सुदाम राठोड,धर्मेंद जाधव,पुजा सुर्यवंशी व पारशिवनीच्या सर्व कृषि सखींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleशंभुक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleनांदेड जिल्ह्यात पवित्र ग्रंथांचे भव्य वितरण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here