आशाताई बच्छाव
शंभुक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य वाटप
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –शंभुक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य वाटप- बहुजन शिक्षण संघ संचलित शंभुक विद्यार्थी वसतिगृह श्रीरामपूर येथे मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, पंचायत समितीच्या मा.सभापती संगिताताई शिंदे, दत्तनगर ग्रामपंचायतच्या सरपंच सारिकाताई कुंकूलोळ यांच्या हस्ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अनुक्रमे गणवेश, वह्या, राईटींग पॅड,पेन, पेन्सिल,खोड रबर,टॉवेल इ.चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्नेहग्रुपचे अध्यक्ष गोरक्षनाथ बनकर, उपाध्यक्ष भागचंद औताडे, सचिव चंद्रकांत मगरे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदिप मगर,मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.सलिम शेख, शिक्षण मंडळाचे मा.सभापती संजय गांगड,मा.बॅंक व्यवस्थापक नानासाहेब शेवाळे, भगतसिंग ब्रिगेड चे अध्यक्ष कृष्णा बडाख, सोमय्या शाळेचे मुख्याध्यापक गोपाळे सर, कल्याण लकडे सर,प्रा.सुनिल वाघमारे, प्रमोद गाडेकर,समिर मुथ्था, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचा वसतिगृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी विद्यार्थ्यांना पाऊच व डि व्हिटॅमिन च्या गोळ्याचे वाटप केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्दार्थ दिवे,मारीया बर्वे, आर्यन घुले,ओम कटारनवरे,अर्जुन पवार,शिवम माळी यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुनिल वाघमारे यांनी केले.