आशाताई बच्छाव
नांदेड मध्ये भारतातील पहिले किन्नर भवन उभारणार : खा.डॉ. अजित गोपछेडे यांनी केली जागेची पाहणी.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड : समाजातील एक वंचित घटक म्हणून ज्या किन्नरकडे पाहिले जाते त्यांचा सामाजिक दर्जा वाढवा. त्यांना प्रतिष्ठा मिळावी या अनुषंगाने खा. डॉ . गोपछडे यांनी यशस्वी प्रयत्न केले असून नांदेड शहरालगत साडेतीन एकर जमिनीवर लवकरच किन्नर भवन उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने जागेची पाहणी आज खा. डॉ. अजित गोपछडे यांनी समाज कल्याण अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसह केली.
समाजातील तिसरा घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या किन्नर , तृतीय पंथीयांचे सामाजिक जीवन अत्यंत हालाखीचे आणि धक्काधूकीचे असे झाले आहे. त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी , त्यांच्या आयुष्यातही सुख यावे या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने तृतीय पंथीयांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत . शिवाय त्यांना चांगले जीवन जगता यावे , त्यांच्या जगण्या मरणाच्या प्रश्नांना न्याय देता यावा यासाठी नांदेड मध्ये कामठा परिसरातील म्हळजा येथे तब्बल साडेतीन एकर जमिनीवर किन्नर भवन उभारण्यात येणार आहे. येथे किन्नर साठी स्मशानभूमी, निवास व्यवस्था व अन्य गोष्टींची ही तरतूद करण्यात येणार आहे . या जागेची पाहणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज केली आहे.
समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे , तहसीलदार संजय वारकड , कमल फौंडेशनचे सचिव अमरदीप गोधणे यांच्यासह रणजीता बकस गुरू , फरिदा बकस, अर्चना बकस, जया बकस, बिजली बकस आदी उपस्थित होते.






