आशाताई बच्छाव
२६ ऑक्टोबर पासून श्रीधाम वृंदावन यात्रा व श्रीमद् संगीत भागवत कथा प्रारंभ
श्रीमद संगीत भागवत कथा प्रवक्ते धर्माचार्य ह भ प निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
जीवनामध्ये सत्संग, तीर्थयात्रा , वृंदावन धाम घडावे ही प्रत्येकाची धारणा असते त्या अनुषंगाने २६ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्रीधाम वृंदावन यात्रा व श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव यांच्या मुखारविंदातुन श्रीमद संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे अतिशय सुंदर पद्धतीने होणाऱ्या श्रीमद संगीत भागवत कथेला गायनाचार्य ह भ प योगेश महाराज बोराडे बाळापूर येवला, हिंदू धर्म सेवक ह भ प अक्षय महाराज पवार लखमापूरकर, तबलजी हभप नवनाथ महाराज राठोड नासिक ,सिंथ वादक हभप विनोद महाराज शिंदे डोंगरगाव चांदवड यांची संगीत साथ लाभणार आहे.अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक हिंदू धर्म सेवक ह भ प अक्षय महाराज पवार लखमापूरकर यांनी दिली आहे.
श्रीधाम वृंदावन यात्रेदरम्यान प्रेम मंदिर, गोवर्धन पर्वत, रासलीला, बरसाना, नंदगांव, वृंदावन श्री बाकेबिहारी मंदिर, मथुरा, गोकुळ, लाल किल्ला, आग्रा आदी पवित्र स्थळी दर्शनाचा लाभ मिळणार असून या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण आजच आपली नाव नोंदणी करावी व श्रीराम वृंदावन यात्रेचा आनंद घ्यावा असे ही आयोजकांनी सांगितले आहे.
*श्रीधाम वृंदावन यात्रेदरम्यान महत्त्वाच्या काही सूचना पुढीलप्रमाणे—*
नाशिक ते मथुरा रेल्वेने प्रवास राहील, यात्रेसाठी AC सिल्पर कोच ची पण व्यवस्था करण्यात आली असून १ ऑगस्ट पर्यंत अॅडव्हान्स देऊन आपले सीट बुक करुन उर्वरीत रक्कम मात्रा निघण्याच्या ८ दिवस अगोदर जमा करावी तसेच कोणत्याही कारणाने यात्रेकरूने प्रवास रद्द केल्यास दिलेली रक्कम परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी. प्रवासात मौल्यवान वस्तु सोबत आणु नये. यात्रेकरूचे जिवीत व वित्तहानिस आयोजक जबाबदार राहणार नाही. नियोजित स्थळांचा बस प्रवास सोडून रिक्षा, टॅक्सी, होडी हा खर्च प्रत्येकाचा वैयक्तिक राहील. वरील प्रवास भाड्यात लक्झरी, रेल्वे, धर्मशाळा, चहा, नाष्टा व २ वेळेचे जेवण राहीत. रोजच्या जीवनावश्यक वस्तु स्वतःच्या सोबत असाव्यात. आधारकार्ड व २ पासपोर्ट साईज फोटो यात्रेवेळी सोबत आणावे. कार्यक्रमाचे आयोजन पूर्णपणे धार्मिक आहे, त्यामुळे सर्वांनी समभाव बाळगुन सहकार्य करावे. १२ वर्षापुढील मुलांना पूर्ण तिकीट लागेल. १२ वर्षाच्या आतील मुलांना ७०% खर्च लागेल, परंतु त्यांना स्वतंत्र सीट मिळणार नाही. नियोजित कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील. प्रवासाच्या पहिल्या दिवसाचा जेवणाचा डब्बा सोबत आणावा असे आवाहन यात्रा मुख्य आयोजक हिंदू धर्म सेवक ह.भ.प.अक्षय महाराज पवार लखमापूरकर यांनी केले आहे.
श्रीधाम वृंदावन यात्रा व श्रीमद संगीत भागवत कथा नाव नोंदणीसाठी धर्माचार्य ह भ प निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव ९४२३०६७४७२,९८८१३१२०४६, हिंदू धर्म सेवक ह भ प अक्षय महाराज पवार लखमापूर ७७०९७४१४२१, ह.भ.प. हिरामण महाराज मोगल ९०९६१८०५१७, ह.भ.प. विनोद महाराज शिंदे डोंगरगाव ८२७५१५८४११, हभप नवनाथ महाराज राठोड नासिक ९६७३२२८१८८ या नंबरवर संपर्क साधावा.