आशाताई बच्छाव
चाळीसगाव पोलिसांनी पकडला ७ लाखाचा गुटखा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतुक करतांना चाळीसगाव शहर पोलीसांनी केलेल्या कारवाईत नागदच्या व्यापार्याचा सुमारे 7 लाख 19 हजार 29 रूपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. वाहनासह 15 लाख 19 हजार 29 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी वाहनाचे दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यासह नागदच्या व्यापार्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, पोकॉ. आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, समाधान पाटील या पथकाने दि 16 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हिरापूर रेाडवर राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ एमएच.41 AU.3210 हे महिंद्रा पिकअप वाहन अडवून तपासले असता त्यात दीपक प्रविणचंद बेदमुथा रा.नागद ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर याचा सुमारे 7 लाख 19 हजार 29 रूपये किंमतीचा गुटखा मिळून आला. हा गुटखा तसेच 8 लाख रूपये किंमतीचे वाहन असा सुमारे 15 लाख 19 हजार 29 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
वाहनचालक सलीम मुनीर खान (24) रा. ग्रीन पार्क,जारगाव चौफुली, पाचोरा, अरबाज इब्राहीम पठाण (22) रा.सार्वे ता. पाचोरा व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन रा. नागद ता.कन्नड या तिघांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006चे कलम 26(2)(आय),26 (2)(आयव्ही), 27(1), 27(3)(डी),27 (3)(ई18 ), 18 सहवाचन कलम 3(आय)(झेडझेड)(व्ही) व कलम 30(2)(एक) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 123,223, 274,275चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास psi संदीप घुले, हवालदार राकेश पाटील करीत आहेत.