आशाताई बच्छाव
माजी आमदार बच्चू कडू यांची अन्न त्याग आंदोलनाची ९ मंत्र्या सोबत मुंबईत बैठक. मेंढा पाडांना चरईक्षेत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन, शासन निर्णयाची प्रतीक्षा. युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अन्य त्या आंदोलनाची दखल घेत गुरुवारी संध्याकाळी मुंबई मंत्रालयात नवु मंत्र्यसोबत बच्चू कडू यांची वेगवेगळी साडेचार तास बैठक झाली. यावेळी मेंढपाळांना दिलासा देणारा निर्णय झाला असून मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना चारण्यासाठी कराईक्षत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र शासन निर्णय होईपर्यंत आपले समाधान होणार नसल्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले. बच्चू कडू यांच्यासोबत बैठकीसाठी संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्न त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत बच्चू कडू यांनी सविस्तरपणे मेंढपाळ व धनगर समाजाच्या समस्या मांडल्या. यानंतर सरकारकडून सकारत्मक कृषी साथ देण्यात आला दुर्लक्षित समाज घटकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी हे आंदोलन निर्णय ठरणार असल्याचे चित्र आहे. बच्चू कडू यांनी या बैठकीनंतर बोलताना सांगितले की आम्ही केवळ आंदोलनासाठी आंदोलन करत नाही तर जनतेच्या हक्कासाठी लढत आहोत. शासन सकारात्मक असून मागण्या मान्य झाल्याचा अधिकृत निर्णय जाहीर होईल. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्या गेले असून आगामी काळात शासनाच्या निर्णयाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे या मंत्र्यांसोबत झाली साडेचार तास बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे दूध विकास व दिव्य मंत्रालय, माणिकराव कोकाटे कृषिमंत्री, नितेश राणे मत्स्य व्यवसाय विभाग मंत्री, भरत गोगावले रोजगार हमी विभाग मंत्री, जयकुमार रावल पणन मंत्री, बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, आकाश कुंडकर कामगार विभाग मंत्री, आणि गणेश नाईक वन विभाग मंत्री यांच्यासोबत बैठक झाली असल्याचे बच्चू कडू यांच्या निकटवर त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. आता सातबारा कोरा यात्रेला होणार सुरुवात गुरुवारी आमच्यासोबत आठ मंत्र्यांची सविस्तर चर्चा केली आमच्या मागण्यांना घेऊन ते सकारात्मक आहेत. मात्र जोपर्यंत मागण्यांची पूर्तता शासन निर्णयातून होणार नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे सात जुलैपासून आमचे सातबारा कोरा यात्रेला सुरुवात होणार असून आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहोत अशी माहिती माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिली १७ मागण्यावर चर्चा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार दिव्यांग विधवा महिला ग्रामपंचायत कर्मचारी बेरोजगार तरुण अशा वंचित आणि अपेक्षित घटकांच्या प्रश्नासाठी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची अखेर शासन स्तरावर दखल घेण्यात आली. १७ महत्त्वाच्या मागण्यावर सफल चर्चा झाली.