आशाताई बच्छाव
लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
शासनाच्या सेवा क्षेत्रात माणुसकीचे व्रत जपणारे लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ ०२ जुलै रोजी तहसील कार्यालय देगलूर येथे संपन्न झाला. २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते पेशकार पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या सेवा कार्याची आणि जनसामान्यांसाठी असलेल्या त्यांच्या आत्मीयतेची उपस्थितांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कार्यक्रमाला तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, नायब तहसीलदार गंदी गुडे मॅडम, नायब तहसीलदार पदमवार साहेब यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी व कद्रेकर यांचा परिवार उपस्थित होता.
कद्रेकर यांनी आपल्या सेवाकाळात हदगाव, नांदेड व देगलूर उपविभागीय कार्यालयात काम करताना शेकडो नागरिकांची कामे प्रामाणिकपणे केली. त्यांच्या समजूतदार व मृदू स्वभावामुळे ते ‘मामा’ नावानेच ओळखले जात होते.
निरोप समारंभात तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी कद्रेकर यांच्या सेवेचं विशेष कौतुक करताना सांगितलं की, “ते केवळ कर्मचारी नव्हते, तर गरिबांचा आधार होते.”
आपल्या मनोगतात कद्रेकर यांनी सर्व सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे आभार मानले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला…






