Home नांदेड देगलुरात नऊ लाखांचा गुटखा जप्त; हिंगोलीतील दोघांवर गुन्हा दाखल.

देगलुरात नऊ लाखांचा गुटखा जप्त; हिंगोलीतील दोघांवर गुन्हा दाखल.

110

आशाताई बच्छाव

1001656721.jpg

देगलुरात नऊ लाखांचा गुटखा जप्त; हिंगोलीतील दोघांवर गुन्हा दाखल.

••••वझरगा येथे पोलिसांची धडक कारवाई; पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारसह मोठा मुद्देमाल जप्त

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

तालुक्यातील वझरगा येथे सोमवार, दिनांक ३० जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करत एकूण नऊ लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तात्काळ कृती करत केली.
या कारवाईत शेख साजीद शेख जलाल बागवान (वय ३८) व शेख अख्तर शेख गफार बागवान (दोघेही रा. सदर बाजार, जामा मस्जिद जवळ, हिंगोली) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. हे दोघे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (MH 12 KN 6039) कारमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वझरगा येथे सापळा रचून संबंधित कार अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात पुढील वस्तूंचा समावेश आहे:
विमल केशरयुक्त पान मसाला – १५ पोते – ₹१,४१,००० व्ही.१ बीग टोबॅको – २० पुडे – ₹९,००० रजनीगंधा पान मसाला – ₹३६,००० सिग्नेचर पान मसाला – २२४ पुडे – ₹१,३४,००० वाहतूक करणारी कार (स्विफ्ट डिझायर, पांढऱ्या रंगाची) – अंदाजे ₹६,००,०००
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹९,२०,४०० एवढी आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील कृष्णा तलवारे, साहेबराव सगरोळीकर, वैजनाथ मोटारगे, राजवंत सिंघ बुंगई व रंजीत मुदिराज यांनी संयुक्तपणे केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीला मोठा आळा बसला असून, नागरिकांतून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Previous articleखरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत.
Next article… आता कुठे आहे ते प्रेम! (एक कविता तिच्यासाठी)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.