आशाताई बच्छाव
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
ताकई – महड रस्त्यावरील खासगी जागेत अवैध गुटखा साठा असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर स्टिंग ऑपरेशन करीत अंदाजे लाख रूपयांचा गुटखा साठा पकडून दिला आहे.
अवैध गुटखा साठा ताकई – महड रस्त्यावरील खासगी जागेतील रूम आणि कंटेनरमध्ये करीत असल्याची गुप्त माहिती मिळली होती. रिपब्लिकन सेनेने रात्री दिड वाजण्याच्या सुमारास स्टिंग ऑपरेशन करीत घटनास्थळी पोहचले.
यावेळी गुटखाने भरलेला टेम्पो चालक फरार झाला त्यानंतर रात्रभर घटनास्थळी थांबून राहिले होते. सकाळी अन्न
सुरक्षा अधिकारी पेण विक्रम निकम यांच्यासह १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची टिम, खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत व्हांयबराळे आणि पोलीस टिमने कारवाई करीत दोन खोल्या आणि कंटेनरचे कुलूप उघडले असता अंदाजे लाख रूपयाच्या आसपास मुद्देमाल आणि मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी स्कुटी एमएच-४६ सी, एफ ८८५२ जप्त केली आहे.
गुटखा विक्री करणारे आरोपी फरार असून यांच्या विरोधात खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी पेण विक्रम निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.