आशाताई बच्छाव
राहुरी येथे ₹ 70लाख 73 हजार 920 रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त … श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील शितलनगर, टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांचे इमारतीत भाड्याने घेतलल्या घरात राहणारे पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय 33, राहणार सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय 42, कर्जत जिल्हा अहिल्यानगर), तात्या विश्वनाथ हजारे (वय 40, पाटेगाव तालुका कर्जत) होंडा शाईन (MH 45 Y 4833) या मोटर सायकलने अहिल्यानगर हून राहुरी कडे येत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पोलीस पथकाने 28 जून रोजी रात्री 21.30 वाजनेचे सुमारास पकडले. आरोपीकडून ₹ 500, ₹ 200 रुपयांच्या नोटासह बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे झेरॉक्स मशीन, कटिंग मशीन, कागद, कॉम्प्युटर आदि असे एकूण ₹ 70,73,920 किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या. मुख्यआरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार हा सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध कुडूवाडी पोलीस स्टेशन (सोलापूर) गुन्हा दाखल आहे, तो 22 महिने तुरुंगात होता.