Home अमरावती भाजपा त एकही भ्रष्टाचार नाही का? रामाचे खरे भक्त असाल तर तुमच्या...

भाजपा त एकही भ्रष्टाचार नाही का? रामाचे खरे भक्त असाल तर तुमच्या एकाही नेत्यांची अजून E. D. चौकशी का झाली नाही हे सांगा माजी आमदार बच्चू कडू.

127

आशाताई बच्छाव

1001635727.jpg

भाजपा त एकही भ्रष्टाचार नाही का? रामाचे खरे भक्त असाल तर तुमच्या एकाही नेत्यांची अजून E. D. चौकशी का झाली नाही हे सांगा माजी आमदार बच्चू कडू. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजप वर सडकून टीका केली आहे. भाजप आणीबाणी पेक्षाही वाईट वागले हे संपूर्ण देशाला माहित आहे. हे लोक खरंच रामाचे भक्त असतील तर त्यांनी आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ED ची कारवाई का झाली नाही हे सांगावे असे त्यांनी म्हटले आहे. संसद व विधिमंडळाचे अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते पण या समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या २ दिवसाच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून लाखोचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे या उधळपट्टीमुळे राज्य विधिमंडळाच्या कारभारावर टीका केली जात असताना बच्चू कडू यांनी भाजपवर उपरोक्त शब्दात निशान साधले आहे बच्चू कडू म्हणाले सध्या स्थिती सरकारमध्ये अत्यंत भावना शून्य लोकं बसलेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाही आज राज्यात दररोज१0 ते १५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे रोजगार हमीच्या मजुरांना वेळेवर पगार मिळत नाही. एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची हे पाहून सर्वसामान्य माणसाच्या किती वेदना होत असतील याची कोणालाही कल्पना नाही सत्यवानचा अंकुश आता सुटलेला आहे एखादा कासवाचे एकदा चारा खाऊ घालायचा आणि दररोज गाई म्हशी कापायचे आहे याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगळे काय करता? तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर सांगा भाजपच्या एकाही नेत्यांची आजपर्यंत EDची चौकशी का झाली नाही ? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणी पेक्षा वाईट चांगले वागले हे संपूर्ण देशाला माहित आहे असे ते म्हणाले. बच्चू कडू यांनी आपल्या कोणत्याही पदाची अभिलाषा नसल्याचे यावेळी ठणकावून सांगितले. अनेकांना वाटत होती माझ्या मनात पदाची लाल साहेब पण ते चुकीचे आहे आमदारकी गेली किंवा अध्यक्ष पद दिले म्हणजे बच्चू कडू थांबणार नाही. माझी एखादी जेलवारी झाली तरी मी थांबणार नाही पण तुमचे किती करावी याची काही मर्यादा आहे. पप्पा तर केले याची फाईल एक महिना कुठे दानाखात होती? अजूनही मला अपात्रीची मोठीच मिळाली नाही हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे भाजपमधील काही जण आम्हाला बदनाम करत आहे बँक तोट्यात आल्याची हवाई उठत आहेत संचालकांनी ही बँकेची बदनामी करू नये मी देवेंद्र फडणवीस यांना फोन करेन कॉम्प्रमाईज होईल असे अनेकांना वाटत होते पण असे काही होणार नाही. कारण माझ्या आडनावातच कडू लागले आहे, असे बच्चू कडू म्हणाले

Previous articleधर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Next articleराज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.